You are currently viewing दोडामार्ग शिवसेना प्रभारी तालुका अध्यक्ष गणेश प्रसाद गवस तर उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांची निवड..

दोडामार्ग शिवसेना प्रभारी तालुका अध्यक्ष गणेश प्रसाद गवस तर उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांची निवड..

दोडामार्ग /-

गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षा लागलेल्या दोडामार्ग तालुका शिवसेना कार्यकारिणी जाहीर करण्यास शुक्रवारी मुहूर्त मिळाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सचिव शिवसेना खासदार विनायक राऊत ,यांच्या आदेशानुसार दोडामार्ग तालुका शिवसेना कार्यकारिणी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी दोडामार्ग येथे जाहीर केली.

यावेळी प्रभारी शिवसेना तालुका प्रमुख म्हणून गणेशप्रसाद गवस तर शिवसेना उपजिल्हाप्रमुख म्हणून बाबुराव धुरी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर शिवसेना तालुका संघटक गोपाळ गवस याची नियुक्ती करुन विभाग प्रमुख उपतालुकाप्रमुख यांची निवड जाहीर करण्यात आली.यावेळी उप तालुका प्रमूख-कोनाळ प्रेमानंद देसाई, उप तालुका प्रमूख सासोली/मणेरी बाबाजी देसाई, उप तालुका प्रमुख माटने सुभाष पागंम, विभाग प्रमुख सासोली- मणेरी, सज्जन धाऊसकर, विभाग प्रमुख कोनाळ संतोष मोर्या, विभाग प्रमुख माटने हर्षद सावंत, सेना तालुका प्रमूख मदन राणे आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.

अभिप्राय द्या..