You are currently viewing कणकवली मार्गावर रिक्षा पलटी,दोन मुली गंभीर जखमी..

कणकवली मार्गावर रिक्षा पलटी,दोन मुली गंभीर जखमी..

कणकवली /-

डंपरने हूल दिल्याने अपघात झाल्याची घटना कळसुली-कणकवली मार्गावर घडली. रिक्षा बाजूला घेण्याच्या प्रयत्नात रिक्षा पलटी झाल्याने झालेल्या अपघातात दोन सख्ख्या बहिणी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अधिक उपचारासाठी गोव्याला हलविण्यात येणार आहे.सध्या एसटी बंद असल्याने कणकवलीला येणार्‍या या कळसुली गावकरवाडी येथील नम्रता घाडीगावकर व निकिता घाडीगावकर या रिक्षाने येत असताना हळवल येथील चढावा नजीकच्या वळणावर हा अपघात घडला. यात एकीच्या पायाला तर दुसरीच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच माजी जि. प. अध्यक्षा संजना सावंत, माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री, वागदेचे माजी सरपंच संदीप सावंत, संदीप मेस्त्री, जाणवलीचे संदीप सावंत, सुशांत दळवी, आनंद घाडीगावकर, कान्हा मालंडकर आदींनी रुग्णालयात धाव घेतली होती.

अभिप्राय द्या..