You are currently viewing महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कुडाळ येथे तिथिनुसार शिवजंयती उत्सहात साजरी.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कुडाळ येथे तिथिनुसार शिवजंयती उत्सहात साजरी.

कुडाळ /-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना तिथीनुसार शिवजंयती उत्सव साजरा करण्याचे आदेश दिले त्यानुसार कुडाळ येथे जिल्हाध्यक्ष धिरज परब. प्रभारी कुडाळ तालुका अध्यक्ष सचिन सावंत यांच्या वतीने गोठोस तिठा येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मोटरसायकल रॅलीची सुरवात करुन नतंर माणगांव बाजारपेठ येथील शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मोटारसायकर रॅली कुडाळ येथे रवाना झाली.
कुडाळ RSN हॅाटेल येथे कुडाळ शहराध्यक्ष सिध्देश कुठाळे व सहकारी यांनी रॅलीचे स्वागत केले तद नंतर मां.जिजाऊचा पुतळ्यास अभिवादन करुन कुडाळ येथील शिवाजी चौक येथे महारांजाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास तालुक्यातील युवक वर्ग मोठया प्रमाणात सहभागी झाला होता. यावेळी जय भवानी “जय शिवाजी या घोषणांनी आसंमंत” दणाणून टाकला.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष धिरज परब. तालुकाध्यक्ष सचिन सावंत, शहराध्यक्ष सिध्देश कुठळे, उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, एस. टी. राज्य उपाध्यक्ष बनी नाडकर्णी, माजी संपर्कअध्यक्ष हेमंत जाधव, मालवण माजी तालुकाध्यक्ष गणेश वाईरकर, संदेश कर्पे- साळंगाव शाखा अध्यक्ष, रोहीत नाईक, निलेश धाग सुशांत परब, सिध्दांत बांदेकर, सुबोध परब,विष्णु मस्के,अभिषेक घाडी, अनिकेत धुरी, प्रताप भोई, बंटी नेवगी, विनित परब, सिध्देश परब, सिताराम परब, सागर सावंत, समिर वाळके, विकास लाड उपस्थित होते. अशाप्रकारे उत्साह वातावरणात शिवजंयती साजरी करण्यात आली.

अभिप्राय द्या..