पुणे /-

निरभ्र आकाश आणि देशाच्या वायव्येकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यात ऊन तळपू लागले आहे. मुंबई-ठाणे परिसरासह कोकणात तर उष्णतेची तीव्र लाट आली आहे. मुंबईचे तापमान ४० अंशांच्या जवळपास पोहोचले, तर रत्नागिरीत कमाल तापमान चाळिशी पार गेले.त्यामुळे या भागात अंगाची लाहीलाही करणारे ऊन आणि प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. विदर्भातही तापमानात झपाटय़ाने वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही दिवसाचे तापमान सरासरीच्या तुलनेत वाढले आहे. तापमानातील ही वाढ संपूर्ण राज्यात पुढील तीन दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

गेल्या आठवडय़ात राज्याच्या बहुतांश भागांत पावसाळी स्थिती होती. कोरडय़ा वातावरणामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुंबई परिसराच्या तापमानात वाढ होत होती. सांताक्रूझ हवामान केंद्रावर राज्यातील उच्चांकी तापमान नोंदविले जात होते. तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. त्यानुसार सोमवारी कमाल तापमानाने मुंबई परिसर आणि कोकणात एकदम उसळी घेतली. रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीच्या तुलनेत तब्बल ८.५ अंशांनी अधिक आहे.

मुंबईत (कुलाबा) ३९.४, तर सांताक्रूझ केंद्रावर ३९.६ अंश कमाल तापमान नोंदविले गेले. ते सरासरीच्या तुलनेत अनुक्रमे ७.९ आणि ६.७ अंशांनी अधिक आहे.किनारी भागामध्ये कमाल तापमान ३७ अंशांपुढे आणि सरासरीच्या तुलनेत ४.५ ते ६.५ अंशांपेक्षा अधिक असल्यास उष्णतेची लाट जाहीर केली जाते.या निकषानुसार हवामान विभागाने मुंबई परिसर आणि कोकणात उष्णेतेची तीव्र लाट जाहीर केली आहे.विदर्भात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत २ ते ३ अंशांनी वाढले आहे. बहुतांश भागांत कमाल तापमान ३७ ते ३९ अंश सेल्सिअस झाले आहे. मराठवाडय़ातही कमाल तापमान सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांनी वाढले आहे. मध्य महाराष्ट्रात सोलापूर, सांगली, नाशिक, पुणे आदी भागांत तापमानात झपाटय़ाने वाढ झाली आहे.

*कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

मुंबई (३९.४), सांताक्रूझ (३९.६), रत्नागिरी (४०.२), अकोला (३९.०), अमरावती (३७.८), बुलढाणा (३६.०), चंद्रपूर (३८.०), गोंदिया (३७.०), नागपूर (३७.२), वाशिम (३८.५), वर्धा (३८.८), पुणे (३५.८), कोल्हापूर (३६.०), महाबळेश्वर (३०.९), नाशिक (३६.२), सांगली (३६.६), सोलापूर (३८.४), औरंगाबाद (३७.३), परभणी (३८.२)

काय घडले?

‘राजस्थानपासून गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छच्या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट आहे. या भागातून थेट महाराष्ट्राकडे आणि मुख्यत: कोकण विभागात कोरडे-उष्ण वारे येत आहेत.’राज्यात गेल्या आठवडय़ात पावसाळी वातावरण होते. दिवसा आकाशाची स्थिती अंशत: ढगाळ होती. त्यामुळे सूर्यकिरणांना अडथळा होता. सध्या निरभ्र आकाश आहे.’त्यामुळे मुळातच तापमानात वाढ झाली असताना वायव्येकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांनी दिवसाच्या कमाल तापमानात अचानक मोठी वाढ झाली आहे.

कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

मुंबई (३९.४), सांताक्रूझ (३९.६), रत्नागिरी (४०.२), अकोला (३९.०), अमरावती (३७.८), बुलढाणा (३६.०), चंद्रपूर (३८.०), गोंदिया (३७.०), नागपूर (३७.२), वाशिम (३८.५), वर्धा (३८.८),

पुणे (३५.८), कोल्हापूर (३६.०), महाबळेश्वर (३०.९), नाशिक (३६.२), सांगली (३६.६), सोलापूर (३८.४), औरंगाबाद (३७.३), परभणी (३८.२)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page