वेंगुर्ला /


रेडी प्राथमिक आरोग्‍य केंद्राला गेले काही वर्ष शवपेटीची मागणी होत होती.ती माजी शिक्षण व आरोग्य सभापती तथा जि. प. सदस्‍य तथा रूग्‍ण कल्‍याण समिती अध्‍यक्ष प्रितेश राऊळ यांच्‍या प्रयत्‍नातून रेडी पोर्ट रेडी यांच्‍या कडून प्रदान करण्‍यात आली. त्‍याचे उद्घाटन प्राथमिक आरोग्‍य केंद्र रेडी येथे रेडी पोर्ट रेडीचे चेअरमन संदीप चव्‍हाण यांचे हस्‍ते करण्‍यात आले.यावेळी जि. प. सदस्‍य तथा रुग्‍ण कल्‍याण समिती अध्‍यक्ष प्रितेश राऊळ, रेडी ग्रा. प. सरपंच रामसिंग राणे, तालुका आरोग्‍य अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्‍नेहा नवार, डॉ. रश्‍मी शुक्ला, डॉ. प्रसाद प्रभूसाळगावकर, शिक्षण विस्‍तार अधिकारी वंदना परब, एकात्मिक बाल विकास प्रकल्‍प अधिकारी शर्मिष्‍ठा सामंत, सदस्‍य सदाशिव रेडकर, मुख्‍य सेविका माधुरी मेस्‍त्री तसेच आरोग्‍य कर्मचारी उपस्थित होते. या वेळी डॉ. नवार यांनी सर्वाचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page