You are currently viewing महिलेला व्हीडिओ क्लीप व्हायरलची धमकी देणाऱ्या युवकाला जामीन.

महिलेला व्हीडिओ क्लीप व्हायरलची धमकी देणाऱ्या युवकाला जामीन.

कणकवली /-

कणकवली:-आपल्या बापाशी असलेल्या अनैतिक संबंधाबाबतचे व्हीडिओक्लिप आपल्याकडे असून शरीरसंबंधांची मागणी केली. तसेच ही मागणी पूर्ण न केल्यास सदरच्या व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी कणकवली पोलिसांत गुन्डा दाखल व सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या मकरंद रमेशचंद्र प्रभूखीत (२५. नांदगांव) याला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. की हांडे यांनी १५ हजाराचा सशर्व जामीन मंजूर केला. संशयितातर्फे अँड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.

घटना अशी संशयित मकरद याच्या बापाने पिडीत महिलेस, आपण पत्नीपासून विभक्त राहत असल्याचे खोटे सांगून लग्नाचे अमिष दाखवून शारिरीक अत्याचार केले होते. याबाबतची माहिती आपणाला असल्याचे सांगून संशयित मकस्ड याने पिडीत महिलेस वरील धमकी दिली होती पिडीत महिला राहत असल्या लॉजवरील रूम सोडण्यासाठीही संशयिताने दबाव आणत तिला मारहाण केली होती. पुढे पिडीत महिला अन्यत्र राहण्यास गेली असतानाही संशचित तिला धमकी देतच होता. याबाबत महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून संशयिताविरोधात भा. वि कलम ३७६, ३५४ अ. ३५४ क. ५०४. ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस ठाण्यात हजेरी लावणे तपासात सहकार्य करणे आदी अटीवर त्याला जामीन मंजूर करण्यात आला.

अभिप्राय द्या..