कुडाळ /-

“बॅ. नाथ पै फाऊंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट आणि मणिपाल हॉस्पिटल गोवा यांच्या वतीने कुडाळ येथे ६ मार्च रोजी मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन” बॅ. नाथ पै फाऊंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट व मणिपाल हॉस्पिटल गोवा यांच्या वतीने व बॅ.नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंग,बॅ.नाथ पै कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी ,यांच्या सहकार्याने रविवार दिनांक ६ मार्च २०२२ रोजी सकाळी १० ते ३.०० यावेळेत निःशुल्क हृदयरोग तपासणी शिबिराचे कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये आयोजन करण्यात आले आहे. .मणिपाल हॉस्पिटल हे देशातील अत्याधुनिक आणि बहुविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणारे आणि देशविदेशातील नागरीकांना जागतिक दर्जाच्या उपचार पद्धती प्रदान करणारे केंद्र म्हणून नावाजलेले आहे. देशभरात कीर्ती पसरलेलं आरोग्य सेवेतील नामांकित मणिपाल गोवा हॉस्पिटल हे त्यांच्या वैद्यकीय सेवेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपून नागरिकांच्या आरोग्यासाठी सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वश्रुत आहे. वेगवेगळ्या सहा अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा ऑपरेशन थेटर बरोबरच २३५कार्यरत बेडस उपलब्धता असणारे असे हे मणिपाल गोवा हॉस्पिटल आता सिंधुदुर्ग साठी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यास सज्ज झाले आहे. २४तास उपलब्ध असणारी आरोग्य सेवा आणि पूर्ण वेळ उपलब्ध असलेले डॉक्टर तसेच दर्जेदार नर्सिंग सुविधा असलेले हे मणिपाल हॉस्पिटल गोवा राज्यातील सर्वात मोठे आरोग्य सुविधा केंद्र असून गोव्याच्या पणजी मधील” दोनापावला” या ठिकाणी स्थित आहे. आरोग्य सेवेसाठी तत्पर असलेल्या अशा या गोवा मणिपाल हॉस्पिटल च्या पुढाकाराने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निशुल्क हृदयरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात येत आहे. सदर हॉस्पिटल मधील नामांकित हृदयरोग तज्ज्ञ डॉ. राकेश देशमाने (MBBS, MS, M.Ch (CTVS)) स्वतः या hn आरोग्यसेवा देणार आहेत. ३५ वर्षावरील व्यक्तींसाठी दिनांक ६ मार्च २०२२ रोजी हे हृदय रोग चिकित्सा शिबीर बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या आवारात नियोजित केले आहे. मणिपाल हॉस्पिटल गोवा यांच्यासोबत बॅरिस्टर नाथ फाऊंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट यांच्या वतीने बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंग बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ फिजीओथेरपी कुडाळ यांच्या सहकार्याने सदर शिबिर संपन्न होणार आहे.यामध्ये करोना होऊन गेल्यानंतर आरोग्य विषयक समस्या असलेल्या रुग्णांनी सुद्धा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर,बॅ‌ नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुरज शुक्ला, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या मीना जोशी यांनी केले आहे.(विशेष म्हणजे बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या मदतीने बॅरिस्टर नाथ पै फाऊंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट या संस्थेने कोकणातील आरोग्यविषयक, सामाजिक ,शैक्षणिक सेवा- सुविधांसाठी पुढाकार घेतला असून. दिनांक १८मार्च २०२२ रोजी वेंगुर्ला येथे त्यांनी आरोग्य विषयक शिबीर घेतले आणि ६ मार्च रोजी वरील प्रकारच्या शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकीची, समाजसेवेची मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात केलेली दिसून येत आहे.) अधिक माहितीसाठी संपर्क -02362221207, प्रथमेश हरमलकर -9404923303

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page