कुडाळ /–
ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री आनंद मेस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओबीसी चे प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक पार पडली.या बैठकीला उपस्थित आदरणीय श्री सुनील भोगटे ,जिल्हाध्यक्ष वैश समाज ,श्री रमण वायंगणकर ,जिल्हाध्यक्ष भंडारी समाज ,श्री काका कुडाळकर जिल्हा पदाधिकारी देवज्ञा समाज श्री.रुपेश पावस्कर ,जिल्हाध्यक्ष शिवसेना ओबीसी सेल श्री.बाळ कनयालकर ,जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी ओबीसी सेल श्री बाळ बोरडेकर ,वैश्य समाज श्री उदय मांजरेकर कुंभार समाज श्री रुपेश पिंगुळकर न्हावी समाज हे उपस्थित होते सदरील बैठकीत निर्णय घेण्यात आला की ओबीसी आरक्षण देण्याबाबत जे धोरण राबवले जात आहे.त्या विरोधात आवाज उठवण्यासाठी सोमवार दिनांक ७ मार्च २०२२ रोजी दुपारी ३-३० वाजता मा. जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन द्यायचं निश्चित करण्यात आले तरी सर्व सिंधुदुर्गातील ओबीसी समाजातील घटकांनी त्यांच्या जिल्हा पदाधिकारी ,तालुका पदाधिकारी व ओबीसी समाजातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले.