You are currently viewing पिंगुळी कार्यकारी सोसायटी च्या निवडणुकीत भाजपप्रणित पॅनलचा दणदणीत विजय.;सर्वच्या सर्व १२ सदस्य निवडून येत विरोधकांना दिला धोबीपछाड

पिंगुळी कार्यकारी सोसायटी च्या निवडणुकीत भाजपप्रणित पॅनलचा दणदणीत विजय.;सर्वच्या सर्व १२ सदस्य निवडून येत विरोधकांना दिला धोबीपछाड

कुडाळ /-

पिंगुळी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी च्या निवडणुकीत भाजप प्रणित रवळनाथ सहकार पॅनलने सर्वच्या सर्व १२ जागांवर दणदणीत विजय मिळवून या सोसायटीवर आपले एक हाती वर्चस्व सिद्ध केले. अत्यंत चुरशीच्या व अटीतटीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी प्रणित रवळनाथ सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना मतदारांनी भरघोस मताधिक्याने विजयी केले. या निवडणुकीमध्ये रवळनाथ सहकार पॅनलचे अजय आकेरकर, मंगेश मसके, प्रसाद दळवी, राजन पांचाळ, विजय दळवी, सुरेंद्र गायचोर, शरदचंद्र खानोलकर, दत्तप्रसाद खानोलकर, नारायण राऊळ, वामन राऊळ, श्रेया बिर्जे व द्रौपदी धुरी या उमेदवारांनी प्रतिस्पर्धी शिवसेना पॅनलच्या उमेदवारांचा पराभव करून सोसायटीवर एक हाती वर्चस्व सिद्ध केले.
या विजयानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून जल्लोष साजरा केला. यावेळी जिल्हा परिषद गटनेते रणजित देसाई, भाजप महिला जिल्हा अध्यक्षा सौ.संध्या तेरसे, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, तालुकाध्यक्ष विनायक राणे, युवक तालुकाध्यक्ष रूपेश कानडे, माजी सभापती विवेक मांडकुलकर, माजी सभापती मोहन सावंत, कुडाळ नगरसेवक निलेश परब, सतीश माडये, तंटामुक्ती समिती अध्यक्ष राघोबा धुरी, अखलाद शेख, मकरंद पिंगुळकर, मंगेश चव्हाण, रणजित रणसिंग, मुन्ना दळवी, प्रसन्न गंगावणे, साई दळवी, आनंद गावडे, शेखर पिंगुळकर, तन्मय वालावलकर, प्रसन्नजीत दळवी, वासुदेव शेटकर, चंद्रकांत मुंड्ये, अनंत धुरी, सौ.साधना माड्ये व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिप्राय द्या..