कणकवली /-

संतोष परब हल्लाप्रकरणांमध्ये ज्यांना न्यायालयाने दोषी ठरवलं . त्या हत्येचा कट रचणाऱ्या आमदार नितेश राणे यांची सशर्त जामिनावर सुटका झाली . अजून केसचा निकाल लागलेला नाही . अशा परिस्थितीमध्ये त्यांचा जो स्वागताचा कार्यक्रम सुरू आहे तो सुसंस्कार संपत चालल्याचा भाग आहे .सत्तेतून पैसा आणि आणि पैशातून सत्ता हे नितेश राणे यांचे राजकारण आहे .विकासाचा मुद्दा बाजूला ठेवत धनशक्तीच्या बळावर निवडणुका जिंकायच्या असे सत्र नितेश राणे यांनी केले आहे. इथेच आले तुम्ही तोंड उघडाच मग कुणाचा बीपी वाढतो, कुणाला उलट्या होतात आणि कोण आजारी पडतो हे तुम्हाला समजेल असा टोला जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष शिवसेना नेते सतीश सावंत यांनी लगावला आहे .शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषद शिवसेना नेते सतीश सावंत बोलत होते.

यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, नगरसेवक कन्हैया पारकर, सचिन सावंत, संतोष परब, रूपेश आमडोस्कर व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. सतीश सावंत म्हणाले, नितेश राणे यांची न्यायालयीन कोठडी रवानगी झाल्यानंतर ते आजारी पडले त्यांना उलट्या होऊ लागल्या, त्यांच्या छातीत दुखू लागले. केवळ न्यायालयीन कोठडीत जाऊ नये यासाठी त्यांचे दुखणे होते. एखाद्या सिने अभिनेत्याला लाजवेल असा अभिनय नितेश राणे यांनी केला असे सांगताना सतीश सावंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व राजकीय दृष्ट्या नेहमीच वैशिष्टपूर्ण राहिला आहे . पण कै. आप्पासाहेब पटवर्धन यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तींच्या पदस्पर्शाने संस्कारित झालेल्या भूमीत घडत असलेल्या आताच्या राजकीय घटना पाहता समाजाच्या मानसिकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते

खर तर जिल्ह्यातील सुसंस्कारित जनतेने आता जाग व्हायलाच हवं नाहीतर येथील आप्पासाहेब पटवर्धन, बॅ. नाथ पै, मधु दंडवते यांचे आदर्श या नव्या पिढीला समजणार नाहीत. न्याय देवते समोर सगळे सामान आहेत हे न्याय देवतेने दाखवून दिले. व पुढेही सत्य समोर येईलच. लोकशाहीत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page