You are currently viewing मोचेमाड नूतन ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन.

मोचेमाड नूतन ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन.

वेंगुर्ला /-


जनसुविधा योजनेतून मंजूर झालेल्या वेंगुर्ले तालुक्यातील मोचेमाड नूतन ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते व खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.यावेळी माजी आमदार शंकर कांबळी, शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, पंचायत समिती सदस्य सुनील मोरजकर, शिवसेना जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन वालावलकर,उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे,वेंगुर्ले शहर प्रमुख अजित राऊळ,निलेश चमणकर,वेंगुर्ले पं. स.कृषी अधिकारी विद्याधर सुतार, सरपंच स्वप्नेशा पालव, उपसरपंच श्रीकांत घाटे, ग्रामसेवक बी. ए.गर्कल,तलाठी बोरकर, ग्रामपंचायत सदस्य यशश्री कुबल, चैताली पालव, प्रीती नाईक, श्वेता गावडे, देविदास गावडे, नारायण गावडे, माजी सरपंच रसिका गावडे, जयश्री गावडे,सिताराम गावडे, माजी पोलीस पाटील परशुराम गावडे,आसोली सरपंच रिया कुडव, ग्रामपंचायत कर्मचारी यशवंत कुबल, संदेश मोचेमाडकर,स्मिता नाईक आदींसह मानकरी,ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी खासदार विनायक राऊत यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करुन शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर करुन घेतल्याबद्दल आ.दिपक केसरकर यांच्या हस्ते त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच आ.केसरकर, यशवंत परब,मानकरी आजोबा गावडे,रामचंद्र गावडे, कृष्णा उर्फ दादा गावडे, रघुनाथ गावडे,अणसुर येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम उर्फ बाळा गावडे, उदय गावडे, धोंडू गावडे, गुंडू गावडे, सूर्यकांत गावडे, माजी सरपंच रसिका गावडे, जयश्री गावडे, सीताराम गावडे, माजी पोलीस पाटील परशुराम गावडे, ग्रामस्थ उत्तम पालव,आसोली सरपंच रिया कुडव इत्यादींचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत सरपंच स्वप्नेशा पालव यांनी आमदार दिपक केसरकर व माजी सभापती व पं. स.सदस्य सुनिल मोरजकर यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम पूर्णत्वास गेल्याने समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संतोष पालव यांनी मानले.

अभिप्राय द्या..