वेंगुर्ला /-
तालुक्यातील पाल- अणसुर पंचक्रोशीतील बहुसंख्य ग्रामस्थांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.सातेरी मंदिर अणसुर येथे मंगळवारी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील ग्रामस्थांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला.नुकताच २५ जानेवारीला मठ वडखोल येथील सुमारे ५० जणांनी काँग्रेस पक्ष प्रवेश केला होता.त्यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष विस्तारत असल्याचे चित्र दिसून येत आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे,जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष
इर्षाद शेख,प्रांतिक सदस्य दादा परब,राष्ट्रीय काँग्रेसचे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष विधाता सावंत,
वेंगुर्ले शहर अध्यक्ष प्रकाश डिचोलकर,सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष समिर वंजारी,सच्चीदानंद बुगडे,गावडे आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी संतोष गावडे, तुकाराम गावडे, सुनिल गावडे, गोपी गावडे, चंद्रकांत गावडे, बाळकृष्ण गावडे, वसंत गावडे, रामचंद्र अणसुरकर,विनायक गावडे, तनुजा गावडे, सुचिता अणसुरकर,गणपत गावडे, रंगनाथ गावडे, हर्षल गावडे, परेश रगजी,वामन गावडे, रमाकांत रगजी,श्रीधर गावडे, आपा गावडे, पुंडलिक गावडे, विजय गावडे आदींसह बहुसंख्य ग्रामस्थांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.दरम्यान वेंगुर्ले तालुक्यात
काँग्रेस पक्ष संघटना वाढीबरोबरच ग्रामीण भागात विकासकामांच्या माध्यमातून जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न सुरुच राहतील,असे विधाता सावंत यांनी बोलताना सांगितले.
