कणकवली /-

आज दिनांक ०७/०२/२०२२ रोजी कणकवली नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ (जुना भाजीपाला मार्केट, आप्पासाहेब पटवर्धन चौक) मध्ये गानसम्राज्ञी, भारतरत्न लतादीदींना यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ, आपण आहात म्हणून आम्ही, ,ॐ नमो भगवते भालचंद्राय* यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रध्दांजली च्या वेळी “मेरी आवाज ही पहचान हैं गर याद रहे” “रहे ना रहे हम महेका करेंगे” “तुम मुझे युॅं भुला ना पावागे ” “सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या”” अखेरचा हा तुला दंडवत “असे सहजगत्या गाऊन जाणाऱ्या लतादीदी काल गेल्या आणि समस्त भारतीयांना व जगभरातील कानसेन जनतेला वास्तवाची जाणीव झाली. असा सुर व स्वर पुन्हा होणे नाही असे प्रतिपादन पत्रकार श्री विजय गावकर यांनी केले.कणकवलीचे पोलीस निरीक्षक श्री सचिन हुंदळेकर यांनीही आदरांजली वाहताना “लतादीदी चे जाणे तमाम भारतीयांना आपल्या परिवारातील च कोणी गेले आहे” अशा पद्धतीने जिव्हारी लागले, यातच त्यांचे अलौकिकत्व दिसुन येते.जेष्ठ पत्रकार श्री अशोक करंबेळकर यांनी असे म्हटले की, “वयाच्या ७ व्या वर्षापासून वयाच्या ९२ व्या वर्षापर्यंत सातत्याने ८५ वर्षे गान रसिकांच्या हृदयावर राज्य करणे” ही सोपी गोष्ट नाही पण “लतादीदी नी ते करुन दाखविले आणि सिने संगीताला एक वेगळाच दर्जा प्राप्त करून दिला.” भारतीय लोक जीवनातील जिवंत दंतकथा दोन अक्षरांचा दैवी सुर भारतरत्न लतादीदी “अशा शब्दात श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी आदरांजली वाहीली,यावेळी उपस्थित सर्वानी पुष्पांजली अर्पण करून आदरांजली अर्पण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page