You are currently viewing भरणीत आढळले बिबट्याचे बछडे परिसरात बिबट मादी चा वावर सिद्ध.;ग्रामस्थांनी दक्षता घेण्याचे वनक्षेत्रपाल घुणकीकर यांचे आवाहन.

भरणीत आढळले बिबट्याचे बछडे परिसरात बिबट मादी चा वावर सिद्ध.;ग्रामस्थांनी दक्षता घेण्याचे वनक्षेत्रपाल घुणकीकर यांचे आवाहन.

कणकवली /-

तालुक्यातील भरणी गावात काजूच्या बागेत बिबट्याचे दोन बछडे आज सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास आढळले. अनिल बागवे यांना 2 बछडे दिसून आले. त्यांनी ही बाब गावचे पोलीस पाटील यांच्या कानी घातली. त्यांनी ही बाब लागलीच वनविभाग अधिकाऱ्यांना कळवली. हा हा म्हणता बिबट्याचे बछडे आढळल्याचे समजल्याने लगतच्या लोकांनी गर्दी केली होती.त्यानंतर त्या बछड्यानी तिथून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. भरणी परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या घटनेला बछड्यांच्या दर्शनाने पुष्टी मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच गावातील ग्रामस्थांच्या गायी चा फडशा बिबट्याने पाडला होता.त्यानंतर ग्रामस्थांच्या मागणीनुसार वनविभागाचे कर्मचारी रात्री च्या वेळेस सरकारी वाहनाने जंगलमय भागात गस्त घालत आहेत. दरम्यान वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांनी घटनास्थळी वनपाल सुतार, वनरक्षक राठोड, वनरक्षक राख, वनमजुर शिर्के यांच्यासह भेट देत पाहणी केली. भरणी भागात बिबट्याचा वावर असून ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी जंगलमय भागात अथवा निर्मनुष्य भागात काम करताना स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन वनक्षेत्रपाल घुणकीकर यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..