You are currently viewing अनधिकृत १५ वाळू रॅम्प जेसीबीच्या सहाय्याने तोडले..

अनधिकृत १५ वाळू रॅम्प जेसीबीच्या सहाय्याने तोडले..

मसुरे /-

मालवण तालुक्यातील कालावल खाडी पात्रात बुधवारी दिवसभर तीन ठिकाणी मसुरे मंडळ अधिकारी एस. आर.चव्हाण यांनी धडक कारवाई करत अनधिकृत वाळू उत्खनन करण्यासाठी उभारलेले १५ रॅम्प जेसीबीच्या सहाय्याने तोडल्याने वाळू व्यावसाईकात खळबळ उडाली आहे. खाडी पात्रा लागत बांदिवडे खुर्द कोईल, सय्यद जुवा, आणि डांगमोडे येथे ही धडक कारवाई करण्यात आली. यावेळी बांदिवडे खुर्द सरपंच श्री साटम, मसुरे पोलीस विवेक फरांदे, तलाठी टी. जी. गिरप, रविराज शेजवळ, कोतवाल सचिन चव्हाण, संतोष चव्हाण, विकास पोयरेकर, तसेच पोलीस पाटील नेवेश फर्नांडिस, सोमा ठाकूर, साटम, उपस्थित होते. यापूर्वी सुद्धा मसुरे मंडळ कार्यक्षेत्रात अनधिकृत वाळू वाहतूक व उत्खनना वर कारवाई करण्यात आली होती. यापुढील काळात आणखी कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती मंडळ अधिकारी एस. आर. चव्हाण यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..