You are currently viewing आमदार नितेश राणेंना दोन दिवसाची पोलीस कोठडी

आमदार नितेश राणेंना दोन दिवसाची पोलीस कोठडी

कणकवली /

संतोष परब हल्लाप्रकरणी कोर्टात शरण गेलेले भाजपा आमदार नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने धक्का दिला आहे. नितेश राणे यांना ४ तारीखपर्यंत दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून १० दिवस पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती. नितेश राणेंचा पीए राकेश राणेच्या मोबाईलवरून हल्ल्यातील आरोपी सातपुते याच्याशी नितेश राणेंचे झालेले मोबाईल संभाषण व राकेश परब व नितेश राणे यांची चौकशी करणे यासाठी पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केली. त्याला नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई, ऍड. उमेश सावंत यांनी आक्षेप घेतला. अखेर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने नितेश राणे यांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

अभिप्राय द्या..