वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुक्यातील परुळे तेरवळे सुनामी आर्यलॅंड येथे मंगळवारी सकाळी ७.३० वाजता अनोळखी युवकाचा किनार्‍यालगत मृतदेह आढळून आला होता. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी निवती पोलिसांना याबाबत माहिती दिली.याबाबत माहिती मिळताच निवती दुरक्षेत्राचे पोलिस सुहास पाटकर,राजू कोळमकर,सुभाष नाईक,केशव नाईक,पी.एन.शेडगे तसेच
सावंतवाडी पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक ए.बी.गोते
आदींनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.सदर मृतदेह हा सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे आपट्याचे गाळू येथून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या महेश सखाराम परब (वय४०) या युवकाचा असल्याचे स्पष्ट झाले.याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित तरुण हा कुडाळला काम शोधायला जातो असे सांगून घरातून निघून गेला होता. मात्र, तो घरी परतला नसल्याने नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला. अखेर त्याचा कोठेही थांगपत्ता न लागल्याने त्यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.त्यानुसार नापत्ताची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान वेंगुर्ला येथे एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने बेपत्ता असलेल्या सदर युवकाच्या नातेवाईकांना ओळख पटविण्यासाठी त्याठिकाणी पाचारण करण्यात आले होते. त्यानी ओळख पटवल्यामुळे अखेर त्याचा मृतदेह
यानंतर परुळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी ६.३० वा.मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page