वेंगुर्ला /-


काँग्रेसने लोकांना सुबत्तेचे दिवस दिले.परंतु आज सिलिंडर,पेट्रोल व अन्य जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर पाहता २०१४ मध्ये जे अच्छे दिनाचे आलेले सरकार आज जनतेला गरीबीकडे नेत आहे.त्यामुळे जनतेला चांगले दिवस पाहिजेत,तर डॉ.मनमोहनसिंग यांच्यासारखे अर्थमंत्री हवेत.येथील ग्रामीण भागातील लोकांनी एकत्र येत विकासासाठी केलेला काँग्रेस पक्षप्रवेश पाहता या भागातील जनतेच्या पाठीशी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा राहणार,असा विश्वास आज मंगळवारी मठ येथे काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी व्यक्त केला.वेंगुर्ले तालुक्यातील मठ वडखोल येथील सुमारे ५० जणांनी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला.ओम स्वयंभू मंगल कार्यालय मठ येथे झालेल्या कार्यक्रमात हा पक्षप्रवेश संपन्न झाला.यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे,प्रांतिक सदस्य दादा परब,महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी,वेंगुर्ले शहर अध्यक्ष प्रकाश डिचोलकर,सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष समिर वंजारी,सच्चीदानंद बुगडे,वेंगुर्ले महिला शहर अध्यक्ष कृतिका कुबल,माजी नगरसेवक दादा सोकटे, सेवादल तालुकाध्यक्ष विजय खाडे, तसेच सामाजिक कार्यकर्ते ललितकुमार ठाकूर,अमोल ठाकूर,माजी सभापती प्रफुल्ल उर्फ बाळू परब,खाडे आदींसह मठ वडखोल पंचक्रोशीतील ग्रामस्थ,महिला उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी म्हणाल्या की,येथील ग्रामीण भागातून लोकांनी काँग्रेस पक्षप्रवेश करुन दर्शविलेला विश्वास निश्चितच सार्थकी लावू.काँग्रेसच्या माध्यमातून विकासाचे मुद्दे मार्गी लावू.महिलांनी राजकारणाच्या माध्यमातून पुढे येऊन समाजकारण करावे.राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी,काँग्रेसची संघटना वाढीसाठी तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी प्रवाहात यावे.महिलांच्या उन्नत्तीसाठी आपले कायम सहकार्य राहील,असेही त्या म्हणाल्या.
ज्येष्ठ पदाधिकारी दादा परब मार्गदर्शन करताना म्हणाले की,मठ गाव हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे.या गावातून लोकप्रतिनिधी म्हणून बऱ्याच जणांनी चांगले काम केले आहे.
आज महाविकास आघाडीचे शिवसेनेचे नेते हे स्वतःच विविध विकासकामांची उदघाटन करीत आहेत.परंतु ग्रामीण भागात आज दिसणारे रस्ते हे काँग्रेसच्या माध्यमातून झाले आहेत.सरकारने मोफत गॅस वाटले,परंतु आज गॅस भरायला जनतेकडे पैसा नाही.त्यामुळे आपल्या भागाचा विकास हवा असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही.पक्षाला मिळणाऱ्या फंडाचा उपयोग वाडीवाडीतील विकासकामांसाठी केला जाईल.मंत्री यशोमती ठाकूर यांच्या माध्यमातून प्रत्येक महिला बचतगटांचा मेळावा वेंगुर्लेत घेण्यात येणार आहे,असे दादा परब यांनी सांगितले.यावेळी महादेव निवजेकर,निकिता निवजेकर, दीक्षा पालव,हेमंत नाईक,मधुकर निवजेकर, दिनेश पालव,शैलेश राऊळ, प्रदिप निवजेकर, संकेत निवजेकर, तेजस निवजेकर, शंकर निवजेकर, रामचंद्र राऊळ, महादेव गावडे, रोहन गावडे, प्रतिभा निवजेकर आदींसह सुमारे ५० जणांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला.प्रास्तविक,सूत्रसंचालन व आभार दादा सोकटे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page