You are currently viewing आंब्रड सेवा सहकारी सोसायटीच्या अफरातफरीतील ४ आरोपींची जामीनावर मुक्तता..

आंब्रड सेवा सहकारी सोसायटीच्या अफरातफरीतील ४ आरोपींची जामीनावर मुक्तता..

कुडाळ /-

आंब्रेड ग्रामविकास सेवा सोसायटी यांचे २०११ ते २०१५ या कालावधीतील लिपिक श्री. दत्तात्रय कदम व चेअरमन श्री. भिकाजी राऊल यानी दिनांक ०१.०४.२०११ ते ३१.०३.२०१५ या मुदतीत रक्कम ९.४०.७७५=00 चा अपहार केला व व्यास लेखा परिक्षक श्री. अमोल बांदेकर व श्री. भास्कर गावडे यांनी कर्जाची थकबाकी असतानाही थकीत कर्जदारांची जाणीवपूर्वक रुजवात घातली नाही म्हणून त्यांच्याविरुध्द सरकारी लेखा परिक्षक श्री. प्रकाश शंकर जाधव यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार कुडाळ पोलीसांनी त्यांच्याविरुध्द भा. द. वि. कलम ४२० ४०३, ४०६, ४०८ ४०९, ४६८, ४७७ अ सह ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला व आरोपींना अटक करण्यात आली. त्यांचा जामीन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कुडाळ यांनी नाकारला म्हणून त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात फौजदारी कार्यप्रणाली संहितेच्या कलम ४३९ प्रमाणे जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. तो प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्री. एस. की. हाडेसाहेब यांनी काही अटी व शर्तीवर व रु.२५,००0=00 चा जावमुचलका देण्याच्या अटीवर मंजूर केला आरोपी नं. १ तर्फे अॅड. यतीश खानोलकर. आरोपी नं. २ तर्फे अॅड. मांडकुलकर व अॅड. भुवनेश प्रभुखानोलकर व लेखापरिक्षक आरोपी नं. ३ व ४ तर्फे अॅड. अजित भणगे, अॅड. मिहिर भणगे, अॅड. स्वप्ना सामंत, अॅड. सुनिल मालवणकर यांनी काम पाहीले.

अभिप्राय द्या..