You are currently viewing मालवण शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थांची विविध नामांकित इंडस्ट्रीजमध्ये निवड..

मालवण शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थांची विविध नामांकित इंडस्ट्रीजमध्ये निवड..

मालवण /-

मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतन या पदविका अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या संस्थेमधील तृतीय वर्ष यंत्र अभियांत्रिकी शाखेतील २८ व अणुविद्युत अभियांत्रिकी शाखेतील १३ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो या इंडस्ट्रीमध्ये निवड झाली आहे. याव्यतिरिक्त ५-६ इंडस्ट्रीजमध्ये विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया चालू आहे.

यंत्र अभियांत्रिकी शाखेतील शांताराम प्रकाश कदम, अनामिका अविनाश शिरोडकर, कोमल पांडुरंग कामत, साक्षी राजू मोरजकर, ओमश्री दशरथ पवार, ओमकार अनिल तायशेटे, आयान बखतीयार खान, शुभम धनंजय कोळगे, शुभम सुहास गावडे, विशाल सत्यवान घाडी, काशिनाथ गुरुनाथ पारकर, रघुनंदन संजीव बांदेकर, आदित्य महेश शिंदे, उझेर अब्दुल्ला शेख, चेतन रमेश गोवेकर, विठ्ठल गोपाळ शेटकर, राहुल प्रवीण मेस्त्री, जयेश सुधीर पार्टे, प्राजक्ता ज्ञानेश्वर गवस, सौरभ सुभाष तेली, दुर्वाकुर सखाराम हरमलकर, हृतिक धोंडी सावंत, प्राजक्ता भरमणा वाणी, ओमप्रसाद गजानन राणे, पंकज गणू राऊळ, प्रथमेश मंगेश माळगावकर, मनिष ठकोजी डामरे, भूषण महेश सरंगले यांची निवड झाली आहे. तर अणुविद्युत अभियांत्रिकी शाखेतील अक्षय भिकाजी केसरकर, प्रणव देवेंद्र चव्हाण, गायत्री प्रवीण जोशी, जितेन प्रकाश बिर्जे, जितेश केसरकर, जितेश मंगेश पांचाळ, कृतिका अशोक बागवे, ओंकार भरत धुरी ,श्रेयस दशरथ पाटकर, स्नेहा संतोष नाईक, सूचित उत्तम नाईक, तेजस विनोद वस्त, तेजश्री मुकुंद लाड या विद्यार्थ्यांची निवड झाली.

तंत्रनिकेतनचे प्रा. आर. डी. पेंदाम, प्र. विभाग प्रमुख यंत्र अभि. प्रा. डी. एन. गोलतकर, प्र. विभाग प्रमुख शास्त्र, प्रा. डॉ. एस. एस. चोपडे, प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी तथा विभाग प्रमुख अणुविद्युत अभि. यांचे मार्गदर्शन व परिश्रमामुळे विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. संस्थेचे प्राचार्य डॉ. एस. ए.पाटील यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.

अभिप्राय द्या..