खारेपाटण /-

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, खारेपाटण संचलित शेठ न म विद्यालय खारेपाटण या हायस्कुल मधील प्राथमिक विभागाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिनाचे औचित्त्य साधून विद्यर्थ्यांकरिता वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन नुकतेच प्रशालेत करण्यात आले होते.

या स्पर्धेचे उदघाटन खारेपाटण हायस्कुल चे लिपिक अनिलकुमार करगुंटकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी खारेपाटण हायस्कुल चे साह्ययक लिपिक तेजस चौगुले, अनिकेत पाटणकर,प्रयोगशाळा सहाय्यक नितीन कोंडविलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

खारेपाटण हायस्कुल प्राथमिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लहान गट वेशभूषा स्पर्धेत कु.स्वारा मिलिंद डोळ,कु.सुखदा संतोष राऊत,कु.शुभ्रा रोहित कुडाळकर,कु.मनस्वी महेश सकपाळ यांनी अनुक्रमे क्रमांक प्राप्त केले. तर वेशभूषा मोठा गट स्पर्धेत -कु.राधिका कांबळी, कु.दीक्षा कर्ले,कु.आराध्या पाटणकर, कु.आदिती सरवणकर,कु.इश्वरी हरयाण,कु.आर्या गाठे, कु.जिया तळगावकर या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे क्रमांक प्राप्त केले. तर मुलामधून वक्तृत्व स्पर्धेत अभिनव हरयाण व रियांश धुमाळे या विद्यर्थ्यांनी क्रमांक पटकावले.

या स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून खारेपाटण महाविद्यालयाच्या प्राध्यापिका  रश्मी देसाई व माधवी पांचाळ यांनी काम पाहिले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खारेपाटण हायस्कुल प्राथमिक विभागाच्या शिक्षिका श्रीम.वृषाली दर्पे,शर्मीन काझी,.आदिती गुरव,प्रिया शिरकर,पूनम गुरव यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page