You are currently viewing वेंगुर्ला तालुका गिरण मालक संघटनेच्या अध्यक्षपदी आकांशा आनंद परब यांची निवड.

वेंगुर्ला तालुका गिरण मालक संघटनेच्या अध्यक्षपदी आकांशा आनंद परब यांची निवड.

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुका गिरण मालक संघटनेच्या अध्यक्षपदी आकांशा आनंद परब यांची निवड करण्यात आली.उपाध्यक्षपदी मयूर आरोलकर, खजिनदार सिद्धेश परब तर सचिव पदी भिकाजीराव सावंत यांची निवड करण्यात आली.आज सोमवारी वेंगुर्ले येथे वेंगुर्ला तालुका गिरणी मालक संघटनेची वार्षिक सभा पार पडली. त्यात नवीन कार्यकारिणी करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी आकांशा आनंद परब यांची एकमताने निवड करण्यात आली.यावेळी त्यांची निवड होताच त्यांचे वेंगुर्ले पंचायत समिती उपसभापती सिद्धेश परब यांनी अभिनंदन केले.या सभेत दरवाढी संदर्भात निर्णय घेण्यात आला.यात वेंगुर्ले तालुक्यात गावागावात जिथे घरघंटीचा व्यवसाय वापर केला जातो, त्यांच्या वर कार्यवाही करण्यात आली, या बाबत संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे असा ठराव घेण्यात आला.या सभेदरम्यान वेंगुर्ले पंचायत समिती उपसभापती सिद्धेश परब, सल्लागार दत्तराज( कुमार) कामत, किशोर परब, नूतन अध्यक्ष आकांशा परब, मयूर आरोलकर, भिकाजीराव सावंत, किशोर वालावलकर, शंकर परब, संदीप बेहेरे, प्रवीण परब, स्वप्नील परब, सिध्दी नाईक, सचिन सामंत, ज्ञानेश्वर पडवळ, ज्ञानदेव पेडणेकर, शेखर गावडे, व तालुक्यातील गिरण मालक उपस्थित होते.

अभिप्राय द्या..