You are currently viewing वेंगुर्ले तालुका शिवसेनेची मासिक सभा संपन्न

वेंगुर्ले तालुका शिवसेनेची मासिक सभा संपन्न

वेंगुर्ला /-

वेंगुर्ले तालुका शिवसेनेची मासिक सभा शिवसेनेच्या तालुका संपर्क कार्यालयात  तालुका प्रमुख यशवंत परब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी अनेक विषयांवर  चर्चा करुन निर्णय घेण्यात आले.यावेळी शहर प्रमुख अजित राऊळ, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन वालावलकर,महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले, महिला शहर संघटक मंजुषा आरोलकर, ओबीसी सेलचे अध्यक्ष निलेश चमणकर, उपतालुका प्रमुख सुधाकर राणे, विभागप्रमुख संजय परब, तसेच मनाली हळदणकर, खानोलकर, कोमल सरमळकर, कुडपकर, गजानन गोलतकर, संदिप केळजी, शैलेश परुळेकर, दिलीप राणे, आनंद बटा, डेलिन डिसोजा, अभि मांजरेकर आदी उपस्थित होते.तालुक्यातील वीज ग्राहकांना विज वितरण कंपनीकडून वीजमिटर बंद असतानाही अवास्तव विज बिल आकारणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी येत असल्याने याबाबत १७ जानेवारी रोजी येथील विज वितरण अधिकाऱ्यांची भेट घेवून त्यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. तसेच तालुक्यातील जि. प. च्या शाळांना सध्या व्यावसायिक दराने विज बिल आकारणी करण्यात येत असून ती बंद करण्यात यावी, अशी मागणीहि यावेळी करण्याचे ठरले.२३ जानेवारी रोजी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी वेंगुर्ले तालुक्यातील शालेय मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्याचे ठरले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे मंजूर असूनही सदर कामे सुरु करण्यात न आल्याने संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सुचना देण्याचे ठरविण्यात आले.

अभिप्राय द्या..