फोंडा /-

फोंडाघाट ग्रामपंचायत लोरे नंबर 1 च्या सभागृहात दिनांक 7 व 8 जानेवारी रोजी ई-श्रमिक कार्ड व बांधकाम कामगार नोंदणी व नूतनीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी पंचायत समिती कणकवलीचे सभापती मनोज रावराणे, सरपंच अजय रावराणे, उपसरपंच रोहिणी रावराणे, ग्रामसेवक ऋतुराज कदम आणि ग्रामपंचायत सदस्य अनंत रावराणे, नरेश गुरव, काशिराम नवले, पूनम मोसमकर, सुनीता नापणेकर, रसिका राणे व कर्मचारी उपस्थित होते.

जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत सदर योजनांचा लाभ भावा व्हावा, या हेतूने सभापती मनोज रावराणे व सरपंच अजय रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून 100 लाभार्थ्यांचे ई- श्रमिक कार्डचे प्रस्ताव तर 150 लाभार्थ्यांचे बांधकाम कामगार नोंदणी व नूतनीकरण प्रस्ताव या शिबिराच्या माध्यमातून शासनास सादर करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी बोलताना सरपंच अजय रावराणे यांनी वेळोवेळी येणाऱ्या शासनाच्या योजना अधिकाधिक कार्यक्षमतेने माझ्या ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्यास आपण सतत प्रयत्नशील राहू, असे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page