You are currently viewing शिष्यवृत्ती परीक्षेत सूरज घरपणकरचे घवघवीत यश,जिल्ह्यात ग्रामीण विभागातून १६ वा क्रमांक केला प्राप्त.

शिष्यवृत्ती परीक्षेत सूरज घरपणकरचे घवघवीत यश,जिल्ह्यात ग्रामीण विभागातून १६ वा क्रमांक केला प्राप्त.

देवगड /-

ऑगस्ट 2021 मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत (इ. ८ वी) डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल, मुटाट या प्रशालेचा विद्यार्थी सुरज दिलीप घरपणकर याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामीण विभागात सोळावा क्रमांक प्राप्त करत उज्वल यश संपादीत केले. या यशाबद्दल सभापती, पं.स. देवगड रवी पाळेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मंडळाचे कार्यवाह सु. ग. परांजपे, सहकार्यवाह रघुनाथ पाळेकर, हीरक महोत्सव समिती उपाध्यक्ष भास्कर पाळेकर, कार्यकारी समिती सदस्या अमृता परांजपे, मुख्याध्यापक, शिक्षक व इतर सर्व कर्मचारी यांनी सूरजच्या या यशाबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ यावर्षी हीरक महोत्सवी वर्ष साजरे करीत असल्याने सूरजने मिळविलेले हे यश विशेष कौतुकास्पद असल्याचे मत कार्यवाह सु. ग. परांजपे यांनी व्यक्त केले. तसेच मंडळाचे अध्यक्ष विश्वास पाळेकर, उपाध्यक्ष धनंजय परांजपे, शिवाजी राणे आणि इतर सर्व पदाधिकारी यांनी फोन करून सूरजचे अभिनंदन व कौतुक केले. इतर विद्यार्थ्यांनी देखील यातून प्रेरणा घेऊन असेच यश संपादन करावे, असे मनोगत सभापती रवी पाळेकर यांनी व्यक्त केले. पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी यांनी देखील सूरजचे कौतुक करीत अभिनंदन केले.

अभिप्राय द्या..