You are currently viewing वडाचापाट हायस्कुल येथे मुंबई येथील डॉ.दीप्ती खोत यांचे मासिक पाळी विषयावर मार्गदर्शन..

वडाचापाट हायस्कुल येथे मुंबई येथील डॉ.दीप्ती खोत यांचे मासिक पाळी विषयावर मार्गदर्शन..

मालवण /-

श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट या प्रशालेमध्ये “जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा”या अभियानांतर्गत “मासिक पाळी व्यवस्थापन”या विषयावर उद्बोधन वर्ग व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी डॉ. दीप्ती खोत (मानसोपचार तज्ञ) मुंबई यानि मार्गदर्शन केले. या चर्चासत्रामध्ये विद्यार्थिनींना मासिक पाळी म्हणजे काय? त्या संदर्भात घ्यावयाची स्वच्छता व काळजी तसेच आहार व मानसिक बदल याविषयी उद्बोधन केले.किशोरवयीन मुलींच्या मनामध्ये येणारे विचार व आकर्षण नैसर्गिक असून मनावर ताबा ठेवणे आपल्याच हातात असते असे सांगत मुलींनी जीवनामध्ये निर्णय कसे घ्यावे याचे मार्गदर्शन केले.या चर्चासत्रात विद्यार्थिनींनी देखील त्यांना छान प्रतिसाद देत,आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.

या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. प्रीती सनये यांनी पाहुण्यांचे स्वागत केले .सूत्रसंचालन वेदिका दळवी यांनी तर आभार कु. प्रतिभा केळुसकर यांनी मानले.

अभिप्राय द्या..