दिव्यांग व्यक्तिंनी शिबिराचा लाभ घ्यावा जिल्हा शल्यचिकित्सकांनी केले आवाहन.

वैभववाडी /-

दिव्यांग व्यक्तींना संगणकीय प्रणालीने प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र देणे करिता जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांचे कार्यालयाच्या वतीने तालुकास्तरीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे गुरुवार दि.२०-०१-२०२२ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे हे शिबीर संपन्न होणार आहे. या शिबिरास डॉ.धनंजय रासम ऑर्थ्रोपेडिक, उप जिल्हा रुग्णालय कणकवली, डॉ.बाळासाहेब जोशी नेत्रशल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग., डॉ. शाम राणे. कान, नाक, घसा तज्ञ ,जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग,. डॉ.रूपाली पाटील मानसोपचार तज्ज्ञ जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग उपस्थित राहणार आहेत.तरी वैभववाडी तालुक्यातील दिव्यांग व्यक्तिंनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांचे वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page