You are currently viewing आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब.

आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब.

मुंबई /-

मुंबई, ता. ०७ : हल्ला प्रकरणी संशयित असलेले आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज होणारी सुनावणी तूर्तास बुधवार पर्यत तहकूब करण्यात आली आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते तथा सतीश सावंत यांचे समर्थक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यासह अन्य ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील काही जणांना अटक झाली. मात्र आमदार नितेश राणे यांच्यासह मनीष दळवी व त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांनी अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. श्री. राणे यांचा अर्ज जिल्हा न्यायालयाने नाकारला होता. त्यावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार होती. परंतु ही सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. मात्र सुनावणी होईपर्यंत श्री. राणे यांच्यावर कठोर कारवाई न करण्याची ग्वाही कायम आहे.

अभिप्राय द्या..