You are currently viewing शिवसेना उपतालुकप्रमुख शरद वायंगणकर यांची पदावरुन हकालपट्टी तर,गोट्या कोळसुलकर यांची उपतालुकाप्रमुखपदी निवड.

शिवसेना उपतालुकप्रमुख शरद वायंगणकर यांची पदावरुन हकालपट्टी तर,गोट्या कोळसुलकर यांची उपतालुकाप्रमुखपदी निवड.

कणकवली /-

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत पक्ष विरोधी काम केल्याचा ठपका ठेवत शिवसेना उपतालुकाप्रमुख शरद वायंगणकर यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर त्या जागी खारेपाटण विभागाप्रमुख असलेल्या महेश उर्फ गोट्या कोळसुलकर यांची उपतालुकप्रमुख पदी नियुक्ती करत असल्याची माहिती जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी दिली.

कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे नूतन उपतालुकाप्रमुख गोट्या कोळसुलकर यांचे नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, बँक संचालक सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, युवा सेना जिल्हाप्रमुख गितेश कडू, नगरसेवक कन्हैया पारकर, बाळू पारकर, अमित मयेकर, शहराध्यक्ष शेखर राणे, रुपेश आमडोसकर, राजू राठोड, हर्षद गावडे, मंगेश सावंत, दामू सावंत, महेंद्र डीचवलकर, तेजस राणे, रिमेश चव्हाण आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..