You are currently viewing कविलकाटे येथील श्री.देव आंबा जत्रा ८ जानेवारीला..

कविलकाटे येथील श्री.देव आंबा जत्रा ८ जानेवारीला..

कुडाळ /-

कुडाळ शहरातील कविलकाटे येथील श्री.देव आंबा जत्रा म्हणजेच “आंब्याची जत्रा ” ही शनिवारी दिनांक ८ जानेवारी रोजी कोव्हिडं -19 च्या सर्व नियमांचे पालन करून होणार आहे.सालाबाद प्रमाणे यावर्षीही श्री.देव आंबा जत्रोत्सव होणार आहे.त्या निमित्ताने देवाला नारळ,केळी ठेवणे,नवस फेडणे हा कार्यक्रम शनिवारी सकाळपासून सुरू होणार आहे.यानिमित्ताने भाविकांनी देवाचे दर्शन घेऊन आपल्या मनोकामना पूर्ण कराव्यात असे देवस्थान कमिटीकडून आवाहन करण्यात आले आहे.या जत्रेच्या निमित्त शनिवारी रात्रौ ठिक १०.०० वाजता श्री.सिध्देश्वर दशावतार नाट्य मंडळ कसई दोडामार्ग यांचा “शाप मुक्त “
हा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे.स्थळ – देव आंबा महापुरुष, बाळकृष्णनगर,कविलकाटे तालुका कुडाळ.तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री- देव आंबा महापुरुष देवस्थान मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.विशेष सुचना – कृपया मास्कचा वापर करावा व कोरोनाच्या नियमांचे पालन करावे.

अभिप्राय द्या..