You are currently viewing आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर उद्या ३० डिसेंबरला निकाल,दोन्ही बाजूंची सुनावणी पूर्ण..

आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर उद्या ३० डिसेंबरला निकाल,दोन्ही बाजूंची सुनावणी पूर्ण..

सिंधुदुर्गनगरी /-

संतोष परब हल्ल्यातील आरोपी आ.नितेश राणे व गोट्या सावंत यांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या 30 डिसेंबर रोजी निर्णय होणार असल्याचे जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश हांडे यांनी सांगितले.आ.नितेश राणे , गोट्या सावंत यांनी या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. या अर्जावर काल 28 डिसेंबर रोजी सायंकाळी उशीरापर्यंत आ.नितेश राणे, गोट्या सावंत यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला.तर आज दुपारनंतर झालेल्या सुनावणीत सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला. सरकारी वकील घरत यांनी केलेल्या युक्तिवादात आ. नितेश राणे, गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला जावा यासाठी जोरदार प्रयत्न केले.दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश हांडे यांनी याबाबत उद्या 30 डिसेंबर रोजी निकाल देणार असल्याचे सांगितले.

अभिप्राय द्या..