You are currently viewing सातरल पावणादेवी मंदिरात दरवाजासह दानपेटीची चोरीला..

सातरल पावणादेवी मंदिरात दरवाजासह दानपेटीची चोरीला..

कणकवली /-

सातरल येथील श्री पावणादेवी मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी काल रात्री चोरून नेली. दानपेटी गर्भगृहाच्या दरवाजाला वेल्डिंग केलेली असल्याने चोरट्यांना ती फोडून नेता आली नाही. त्यामुळे दरवाजासह त्यांनी ती दानपेटी चोरून नेली आणि गावातील गडनदीच्या किनारी ती दानपेटी फोडून त्यातील रक्कम घेऊन चोर पसार झाले आहेत. फोडलेल्या दानपेटीसह दरवाजा नदीकिनारी आढळून आला आहे.

अभिप्राय द्या..