You are currently viewing माजगाव उद्यामनगर येथील दीड वर्षीय चिमुकल्याचा बाथरूममधील पाण्याच्या पिंपात बुडून मृत्यू..

माजगाव उद्यामनगर येथील दीड वर्षीय चिमुकल्याचा बाथरूममधील पाण्याच्या पिंपात बुडून मृत्यू..

सावंतवाडी /-

माजगाव उद्यामनगर परिसरात राहत असलेल्या नाईक कुटुंबातील दीड वर्षीय चिमुकल्याचा बाथरूममधील पाण्याच्या पिंपात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी 8 वा च्या सुमारास घडली. विघ्नेश जयराम नाईक असे त्याचे नाव आहे. वडील जयराम गुरू नाईक यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विघ्नेशचे वडील सकाळी कामानिमित्त बाहेर गेले होते तर आई आपल्या घर कामात व्यस्त होती. यावेळी चिमुकला घरच्यांची नजर चुकवून • बाथरूम मध्ये गेला पाण्यात खेळत असताना त्याचा तोल बाथरूम मध्ये असलेल्या पाण्याच्या पिंपात जाऊन तो त्यात कोसळला. याकडे बराच काळ कोणाचा लक्ष गेला नाही ज्यावेळेस वडील घरात आले त्या वेळी ते बाथरूम मध्ये गेले असता त्यांना विघ्नेश पाण्यात बुडाला असल्याचे दिसले त्यांनी लगेच आरडाओरड करत त्याला बाहेर काढले व तात्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत विघ्नेशच्या वडिलांनी याबाबत पोलिसात खबर दिली पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी करत पंचनामा केला.

अभिप्राय द्या..