You are currently viewing विभागीय नियंत्रकांच्या ‘त्या’ ड्रायव्हरने अखेर केली मान्य चूक शिवीगाळ करत अंगावर गाडी घालण्याचे प्रकरण लागले मार्गी..

विभागीय नियंत्रकांच्या ‘त्या’ ड्रायव्हरने अखेर केली मान्य चूक शिवीगाळ करत अंगावर गाडी घालण्याचे प्रकरण लागले मार्गी..

कणकवली /-

कणकवलीत संपात सहभागी झालेल्या काही कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत अंगावर गाडी घातल्या प्रकरणी त्या विभागीय नियंत्रकाच्या ड्रायव्हरने आपली चूक मान्य केल्याने या प्रकरणावर पडदा पडलाय. सकाळी दहाच्या सुमारास सिंधुदुर्ग विभागीय नियंत्रकाच्या चालकाने अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करत शिवीगाळ केल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला होता. त्यावर विभागिय नियंत्रक प्रकाश रसाळ यांच्या समवेत दुपारी 3 वाजता झालेल्या बैठकीत संबंधित चालकाने आपली चुक मान्य केल्याने या सर्व प्रकरणावर पडदा पडला आहे.

अभिप्राय द्या..