You are currently viewing शिवसेना उमेदवार सई काळप यांनी घेतली प्रचारात जोरदार मुसंडी डोर,टू..डोर प्रचारात आघाडी…

शिवसेना उमेदवार सई काळप यांनी घेतली प्रचारात जोरदार मुसंडी डोर,टू..डोर प्रचारात आघाडी…

कुडाळ /-

प्रभाग क्रमांक १३ मधील शिवसेना उमेदवार सई देवानंद काळप यांनी आपल्या प्रचाराला प्रारंभ केला असून त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कुडाळ नगरपंचायतीचे पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूकीचे जोरदार वारे सुरू झाले आहे. उमेदवार सई देवानंद ऊर्फ सचिन काळप यांनी आपले पती माजी नगर सेवक सचिन काळप यांच्यासमवेत जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे श्रीराम वाडी प्रभागातही अशाच प्रकारची विकासकामे करावयाचे आहेत जी कामे राहिली आहेत. ती पूर्ण करण्याचे आश्वासन देखील यावेळी त्यांनी दिले. मतदारांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे. त्याच बरोबर पक्षश्रेष्ठींनी दाखवलेला विश्वास मी निश्चितच सार्थ ठरवेल असा विश्वास सई काळप यांनी व्यक्त केला.

अभिप्राय द्या..