You are currently viewing कोरोना,ओमेक्राँनला आळा घालण्यासाठी ३१ डिसेंबरच्या सार्वजनिक सादरीकरणावर बंदी घालावी.;हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मागणी..

कोरोना,ओमेक्राँनला आळा घालण्यासाठी ३१ डिसेंबरच्या सार्वजनिक सादरीकरणावर बंदी घालावी.;हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मागणी..

कुडाळ /-

गेली दोन वर्षे कोरोना महामारीने देशभरात कहर केला आहे.‘ओमीक्राँन’ नावाच्या कोरोनाच्या नवा ‘व्हेरीयंट’मुळे पुन्हा जगभरात कोरोनाची लाट येण्याची शक्यता आहे. फटाके फोडल्याने प्रदूषण होऊन मोठ्या प्रमाणात श्वसनाचे त्रास वाढतात. अशा वेळी 25 डिसेंबर पासून 31 डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात पार्ट्या होतात, याद्वारे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यताही अधिक आहे. या काळात सार्वजनिक आरोग्य धोक्यात घालणे परवडणारे नसल्यामुळे ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने 31 डिसेंबरच्या दिवशी होणार्या सर्व प्रकारच्या सार्वजनिक साजरीकरणावर (‘सेलिब्रेशन’वर) आणि फटाके फोडण्यावर बंदी घालावी. तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान-धूम्रपान अन् पार्ट्या करण्यावर प्रतिबंध आणावा. पोलिसांची गस्तीपथके नेमून याचे उल्लंघन करणार्यां कारवाई करावी. तसेच येत्या 31 डिसेंबर या दिवशी राज्यातील किल्ले, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, धूम्रपान करणे, पार्ट्या करणे आणि सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडणे यांस प्रतिबंध करण्याचा आदेश काढावा. तसेच या ठिकाणी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाचे नियोजन करून समाजातील अपप्रवृत्तींना आळा घालावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या या कुडाळ तहसिलदार, पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

हिंदु जनजागृती समिती ही राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती करणारी सेवाभावी संस्था आहे. समिती सार्वजनिक उत्सव आणि इतर कार्यक्रमांत होणार्या गैरप्रकारांबद्दल उदा. राष्ट्रध्वज, राष्ट्रीय प्रतिके आणि मानचिन्हे यांची विटंबना रोखणे, फटाक्यांद्वारे होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण, तसेच देवतांची विटंबना थांबवणे अशा विविध विषयांमध्ये गेली 20 वर्षे जनजागृती करत आहे, तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यांना साहाय्यही करत आहे.

31 डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात धूम्रपान, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन आदी केले जाते. तसेच या रात्री मद्यपान करून भरधाव वाहने चालवल्याने अपघातही होत आहेत. गंभीर बाब म्हणजे या रात्रीपासून मद्य पिण्यास आरंभ करणार्या युवापिढीचे प्रमाण लक्षणीय असून यामध्ये अल्पवयीन मुले आणि महिला यांचाही समावेश आहे. रात्रभर मोठ्या आवाजाचे फटाके उडवून प्रदूषण करणे, तसेच कर्णकर्कश ध्वनीवर्धक लावणे, अश्लील अंगविक्षेप करून नाचणे, शिवीगाळ करणे, मुलींची छेडछाड-विनयभंग-बलात्कार आदी कुकृत्ये करून एकूणच कायदा अन् सुव्यवस्था यांच्या दृष्टीने गंभीर स्थिती निर्माण होत आहे. त्याचा अतिरिक्त ताण पोलीस आणि प्रशासन यांवर येतो.

गेली दोन वर्षे कोरोना महामारीने देशभरात कहर केला आहे. ‘ओमीक्राँन’ नावाच्या कोरोनाच्या नवा ‘व्हेरीयंट’मुळे पुन्हा जगभरात कोरोनाची लाट येण्याची शक्यता आहे. फटाके फोडल्याने प्रदूषण होऊन मोठ्या प्रमाणात श्वसनाचे त्रास वाढतात. अशा वेळी 25 डिसेंबर पासून 31 डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात पार्ट्या होतात, याद्वारे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यताही अधिक आहे. या काळात सार्वजनिक आरोग्य धोक्यात घालणे परवडणारे नाही. त्यामुळे ख्रिसमसनिमित्त 25 डिसेंबरला आणि ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने 31 डिसेंबरच्या दिवशी होणार्या सर्व प्रकारच्या सार्वजनिक साजरीकरणावर (‘सेलिब्रेशन’वर) आणि फटाके फोडण्यावर बंदी घालावी. या रात्री राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळे, गड-किल्ले, ऐतिहासिक स्थळे आदी सार्वजनिक ठिकाणांवर जाण्यास मज्जाव करण्यात यावा. तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान-धूम्रपान अन् पार्ट्या करण्यावर प्रतिबंध आणावा. पोलिसांची गस्तीपथके नेमून याचे उल्लंघन करणार्यां कारवाई करावी. तसेच येत्या 31 डिसेंबर या दिवशी राज्यातील किल्ले, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, धूम्रपान करणे, पार्ट्या करणे आणि सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडणे यांस प्रतिबंध करण्याचा आदेश काढावा. तसेच या ठिकाणी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाचे नियोजन करून समाजातील अपप्रवृत्तींना आळा घालावा आणि नीतीमान समाज घडवण्यास सहकार्य करावे, ही नम्र विनंती ! या विधायक कार्यात साहाय्याची आवश्यकता भासल्यास हिंदु जनजागृती समिती यासाठी तत्पर असेल अशी माहिती हिंदू जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आली आहे. कुडाळ- येथील पोलीस ठाण्याचे निरीक्षक फुलचंद मेंगडे तहसीलदार अमोल पाठक, संत राऊळ महाराज महाविद्यालय अधीक्षक एन. व्ही. भांडारकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी धर्माभिमानी हरिलाल पटेल,समीर सावंत. समितीचे आनंद नाईक नामदेव सावंत. हेमंत कोरगावकर, राजेंद्र पाटील,हिंदू जनजागृती समितीचे पदाधिकारी
उपस्थित होते.

अभिप्राय द्या..