You are currently viewing नारायण राणे यांची नगरपंचायत निवडणुकीबाबत दुटप्पी भूमिका,ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत निवडणूका स्थगित कराव्यात.;ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर.

नारायण राणे यांची नगरपंचायत निवडणुकीबाबत दुटप्पी भूमिका,ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत निवडणूका स्थगित कराव्यात.;ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर.

कुडाळ /-

महाराष्ट्रात सध्या नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे,मात्र भाजपाचे पदाधिकारी वाघ यांनीओबीसी आरक्षणा विरोधात सर्वोच्च न्यायालयात केस दाखल करून ओबीसी आरक्षण रद्द करण्याची मागणी केली,त्यामुळे नगर पंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत ओबीसी जागा रिक्त ठेवून अन्य जागावरील निवडणूका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले, न्यायालयाच्या या अनपेक्षित निकाला मुळे ओबीसी समाजाबरोबरच सर्वच राजकीय पक्षांना धक्का बसला, त्यामुळे सर्व स्तरातून ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकाच घेऊ नये,अशी मागणी जोर धरू लागली,तसेच महाविकास आघाडी सुद्धा ओबीसी आरक्षण डावलून निवडणूका नको म्हणून कॅबिनेट बैठकीत सर्वानुमते निर्णय घेतला की निवडणुका झाल्या तर ओबीसींना घेऊनच अन्यथा सर्वच निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यात यावा, जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही,तोवर निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूका स्थगित कराव्यात असे ठरविले.तसेच सर्वच राजकीय पक्षांची भुमिका हीच आहे.मग भाजपचेच केंद्रीय मंत्री नारायण राणे हे निवडणूका ठरलेल्या वेळेतच घेतल्या पाहिजेत,महाविकास आघाडीच्या बाजूने जनमत नसल्याने घोषित निवडणूका राज्य सरकारचा पुढे ढकलण्याचा डाव आहे असे सभ्रमीत विधान करुन भारतीय जनता पक्ष ओबीसी समाज आरक्षणा विरोधात आहे हे ओबीसी समाजाला समजलं आहे, येत्या प्रत्येक निवडणुकीत ओबीसी समाज भारतीय जनता पक्षाला सहकार्य करणार नाही, असे नमुद करून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे निवडणुकी घेण्याबाबतचे ते विधान भारतीय जनता पक्षाचे की व्यक्तीगत नारायण राणे यांचे मत आहे ॽ याचा खुलासा नाम.नारायण राणे यांनी करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कनयाळकर यांनी केली असून जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली लागत नाही तोपर्यंत कुठल्याही निवडणूका निवडणूक आयोगाने घोषित करू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कनयाळकर यांनी स्पष्ट केले.

अभिप्राय द्या..