You are currently viewing माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठात निमंत्रित प्राध्यापक म्हणून नियुक्ती

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठात निमंत्रित प्राध्यापक म्हणून नियुक्ती


सिंधुदुर्ग /-

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. लंडनमधील प्रतिष्ठित लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठात निमंत्रित प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. प्रभू यांच्याकडील समृद्ध आंतरराष्ट्रीय ज्ञान, विद्वता तसेच जगभरातील अनेक प्रमुख देशांतील महनीय नेत्यांशी असलेला त्यांचा संपर्क यामुळेच प्रभू यांना निमंत्रित प्राध्यापक म्हणून आमंत्रित करण्यात आले.

प्रभू यांनी आतापर्यंत केंद्र सरकारमध्ये ऊर्जा, पर्यावरण, रेल्वे आणि नागरी उड्डाण मंत्री अशी महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. सध्या ते आंध्र प्रदेशमधून राज्यसभेत कार्यरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्‍वासू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

अभिप्राय द्या..