You are currently viewing दिल दोस्ती दुनियादारी ग्रुप कणकवलीच्या वतीने सव्वा लाखाची रुपये प्रथम पारितोषिक असलेली क्रिकेट स्पर्धा ९ फेब्रुवारी पासून सुरू.

दिल दोस्ती दुनियादारी ग्रुप कणकवलीच्या वतीने सव्वा लाखाची रुपये प्रथम पारितोषिक असलेली क्रिकेट स्पर्धा ९ फेब्रुवारी पासून सुरू.

कणकवली /-

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित दिल दोस्ती दुनियादारी ग्रुप कणकवली आयोजित सुमारे सव्वा लाख रुपये प्रथम पारितोषिक असलेली कै. बाळ पावसकर स्मृती चषक २०२२ ही क्रिकेट स्पर्धा क्रीडा रसिकांसाठी सज्ज झाली आहे. ९ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी या दरम्यान ही स्पर्धा होणार असून ह्या वर्षी ही स्पर्धा लीग पद्धतीने खेळवली जाणार असल्याची माहिती दिल दोस्ती दुनियादारी ग्रुप कणकवली यांच्या माध्यमातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

गतवर्षी झालेल्या क्रिकेट स्पर्धेत दिल दोस्ती दुनियादारी ग्रुपच्या वतीने २०२२ साली जिल्ह्यातील खेळाडूंना नावलौकिक देणारी मोठी स्पर्धा भरवू, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार ९ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी या दिवसात ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा लीग पद्धतीने होणार असून संघ मालकांनी राज्य किंवा राज्याबाहेरील कोणतेही दोन खेळाडू आयकॉन म्हणून घ्यावेत व इतर खेळाडू जिल्ह्यातीलच असावेत व लीग पद्धतीने खरेदी करावेत, असा नियम या स्पर्धेदरम्यान ठेवण्यात आला आहे. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक १ लाख २२ हजार २२२ व आकर्षक चषक तर द्वितीय पारितोषिक ६२ हजार २२२ व आकर्षक चषक व इतर आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेत १६ संघ खेळविण्यात येणार आहेत. इच्छुक संघ मालकांनी ३१ डिसेंबरपर्यंत आपली नाव नोंदणी करण्यासाठी राकेश पावसकर – ९८५०१०२६७८ व धैर्यशील रावराणे – ९८९०८८८५९० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन दिल दोस्ती दुनियादारी ग्रुप कणकवली यांच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यातील खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लागणारे फॉर्म ऑनलाइन उपलब्ध असणार आहेत.याची क्रिकेट संघानी नोंद घ्यावी.

अभिप्राय द्या..