You are currently viewing आशिया थाई बॉक्सिंग स्पर्धेत मिठमुंबरी येथील वीर मुंबरकरने कांस्य पदकावर कोरले नाव.

आशिया थाई बॉक्सिंग स्पर्धेत मिठमुंबरी येथील वीर मुंबरकरने कांस्य पदकावर कोरले नाव.

देवगड /-

आशिया खंडातील १२देशांचा सहभाग असलेली आशिया थायी बॉक्सिंग स्पर्धा 2021 ही स्पर्धा 3 ते 5 डिसेंबर 2021 या कालावधीत पार पडली.
या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना देवगड तालुक्यातील मिठमुंबरी येथील वीर प्रविण स्वराली मुंबरकर याने कांस्य पदकावर आपले नाव कोरले आहे. विरच्या या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा जागतिक नकाशावर कोरले गेले आहे.

वीर मुंबरकर हा मूळचा देवगड तालुक्यातील मिठमुंबरी गावचा असून तो सध्या पनवेल येथे वास्तव्यास आहे. त्याचे वडील प्रवीण मुंबरकर हे मुंबई महानगरपालिकेत काम करतात. ११ वर्षीय वीर पनवेल येथील न्यू आशाप्रभा इंग्लिश स्कूल विचुंबे येथे इयत्ता सातवीत शिकत आहे. युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन या कराटे अकॅडमीत तो कराटे व थाई बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत आहे. हैद्राबाद येथील सरूरनगर ईनडोअर स्टेडियम तेलंगणा येथे दि. ०३ डिसेंबर ते ०५ डिसेंबर २०२१ या कालावधीत १२ आशियाई देशांची आशिया थाई बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट कौशल्यपूर्ण प्रदर्शनाने वीर मुंबरकर याने ०९ ते ११ वर्षे वयोगटातून ब्रॉंझ पदकावर आपले नाव कोरले आहे. त्याच्या या यशात आई वडील तसेच प्रशिक्षक प्रशांत गांगार्डे, रोहित भोसले, प्राची पवार यांचा महत्वाचा वाटा असल्याचे त्याने सांगितले आहे. वीर ने मिळविलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा