You are currently viewing खा.विनायक राऊत यांच्या उपस्थितीत वैभववाडी नगरपंचायत बाबत सेना – राष्ट्रवादीत जागावाट.

खा.विनायक राऊत यांच्या उपस्थितीत वैभववाडी नगरपंचायत बाबत सेना – राष्ट्रवादीत जागावाट.

वैभववाडी /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला राष्ट्रीय काँग्रेसने ” हात ” दाखवला असला तरी वैभववाडी नगरपंचायत निवडणुक शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्या हातात हात घालून लढणार असल्यावर खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या द्विपक्षीय नेत्यांच्या आज रात्री झालेल्या चर्चेत निश्चित ठरले आहे. आज रात्री झालेल्या बैठकीला शिवसेनेच्या वतीने शिवसेना नेते अतुल रावराणे, संदेश पारकर, मंगेश लोके , रवींद्र रावराणे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते. वैभववाडी नगरपंचायत मध्ये सत्तापरिवर्तन करायचेच या ध्येयाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेदरम्यान आज वैभववाडीत झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत जागा वाटपाचाही फॉर्म्युला ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अपेक्षित जागा आणि अन्य बाबी खासदार राऊत यांच्यासमोर आजच्या बैठकीत मांडण्यात आला.जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्याशी चर्चेनेनंतर शिक्कामोर्तब होणार आहे.

अभिप्राय द्या..