You are currently viewing दोडामार्गच्या राजकारणात मोठा भूकंप होत, काही कार्यकर्त्यांची बदलू शकते दिशा.

दोडामार्गच्या राजकारणात मोठा भूकंप होत, काही कार्यकर्त्यांची बदलू शकते दिशा.

दोडामार्ग /-

निवडणुकीचा काळ अवघ्या काही दिवसांच्या कालावधीवर आला असून हा काळ दोडामार्ग मधील प्रत्येक राजकीय पक्षासाठी तडजोडीचा ठरणार असल्याचे एकंदरीत चित्र दोडामार्गच्या राजकारणात निर्माण होताना दिसत आहे, त्यातच प्रत्येक राजकीय पक्षामध्ये काही नवीन चेहरे दिसण्याची चिन्हे निर्माण होताना देखील दिसत असून यामुळे कोणता पक्ष मोठ्या प्रमाणात प्रबळशाली बनेल हे देखील पाहणे खूप आवश्यक आहे.
दोडामार्ग मधील काही पक्षांमध्ये गटबाजी हा प्रकार मोठ्या प्रमाणात असल्याने काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी तर काही कार्यकर्त्यांमध्ये खुशयाली दिसत असून यामुळे कार्यकर्त्यांमध्ये फूट पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत यात काही शंकाच नाही त्यातच अवघ्या काही दिवसांवर जिल्हा बँक व दोडामार्ग नगरपंचायतची निवडणूक आली असून निवडणुकीच्या संदर्भात वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयांमुळे काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याने काही कार्यकर्त्यांची दिशा बदलण्याची चिन्हे दिसत असून,रात्री उशिरापर्यंत होणाऱ्या गुप्त बैठकांमुळे दोडामार्गच्या राजकारणाला वेगळे वळण येत भूकंप होत काही कार्यकर्त्यांची दिशा बदलणार असल्याने दोडामार्गच्या राजकारणात खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे,यात मात्र सामान्य जनतेची गळचेपी होणार असल्याने सामान्य वर्गात तीव्र नाराजी असल्याचे दिसत आहे,तर कायमस्वरूपी एकमेव पक्षनिष्ठ म्हणून समाजात असणारा कार्यकर्ता देखील पक्ष बदलताना दिसणारा आहे तसेच यामुळे दहा हत्तीचे बळ घेत रिंगणात कोण उतरणार हे बगणे तेवढेच उत्सुकतेचे ठरेल.

अभिप्राय द्या..