You are currently viewing दोडामार्ग नगरपंचायतच्या मनसे सतरा च्या सतरा जागा लढवणार; तालुकाध्यक्ष सुनिल गवस.

दोडामार्ग नगरपंचायतच्या मनसे सतरा च्या सतरा जागा लढवणार; तालुकाध्यक्ष सुनिल गवस.

दोडामार्ग /-

०१डिसेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोडामार्ग तालुक्याची बैठक झाली असता
या बैठकीत कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या निवडणूक अनुषंगाने चर्चा करण्यात आली, त्या अनुषंगाने १७जागावर उमेदवार देण्या संदर्भात आरक्षणा नुसार उमेदवार चाचपणी करण्यात आली, सेवाभावी सामाजिक कार्यकर्ते,उच्चशिक्षित, नव्या युवा चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे, असे या बैठकीत ठरवण्यात आले असता आज दोडामार्ग नगरपंचायत प्रत्येक वॉर्डामध्ये नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत,आणि सत्ताधारी पूर्ण-पणे अपयशी ठरले आहेत,
तसेंच उमेदवारी वरून अंतर्गत मतभेद नाराजी ऐकायला मिळत आहे,त्याचा फायदा मनसेला होणार आहे असे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात तालुकाध्यक्ष सुनील गवस यांनी म्हटले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब, दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुनील गवस, जगन्नाथ गावडे
गुरुदास गवंडे,अभी खांबल, सुनिल गवस, नारायण गवस उपस्थित होते.

अभिप्राय द्या..