You are currently viewing कुडाळ शहरातील नागरिकांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

कुडाळ शहरातील नागरिकांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

कुडाळ /-

कुडाळ शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधील अनेक नागरिकांनी आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. कुडाळ शिवसेना शाखा येथे शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून त्यांचे शिवसेनेत स्वागत करण्यात आले. कुडाळ नगरपंचायत निवडणूक होऊ घातली असून शिवसेनेत प्रवेश करून नागरिकांनी शिवसेनेची ताकद आणखी वाढविली आहे. या सर्वांचा पक्षात सन्मान ठेवला जाईल. शिवसेना पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घ्यावयाची आहे असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. यामध्ये उमर शेख,महेश कोरगावकर, बिलाल शेख, अल्लाउद्दीन शेख, सलीम मुजावर, सोहेल वाडकर, आफ्फान वाडकर, समशेर शेख, तुराब मुजावर, मुश्ताक वाडकर, आमीन शेख, मैनुद्दीन मुजावर, इम्तियाज मुजावर, इस्माईल साब बलोरळी, कमाल मोगल यांसह अनेक नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जी.प. गटनेते नागेंद्र परब, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, उपसभापती जयभारत पालव, माजी जि.प.अध्यक्ष विकास कुडाळकर,तालुका संघटक बबन बोभाटे, शहरप्रमुख संतोष शिरसाट, अतुल बंगे,संजय भोगटे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, संदीप म्हाडेश्वर, किरण शिंदे, चेतन पडते, नितीन सावंत, कृष्णा तेली. सतीश अडुळकर,उदय मांजरेकर, सतीश कुडाळकर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

अभिप्राय द्या..