You are currently viewing सीएसआर निधीतून सायकल बँक अंतर्गत सायकल वाटप वितरण समारंभ आज आरोंदा हायस्कूल आरोंदा या प्रशालयेत पडला पार.

सीएसआर निधीतून सायकल बँक अंतर्गत सायकल वाटप वितरण समारंभ आज आरोंदा हायस्कूल आरोंदा या प्रशालयेत पडला पार.

दोडामार्ग /-

मानव साधन विकास संस्था संचालित परिवर्तन केंद्र संकल्पनेअंतर्गत जन शिक्षण संस्था सिंधुदुर्ग तर्फे माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नातून गोवा विमानतळ प्राधिकरण यांचे सीएसआर निधीतून सायकल बँक अंतर्गत सायकल वाटप वितरण समारंभ आज आरोंदा हायस्कूल आरोंदा या प्रशालयेत पार पडला. हा कार्यक्रम शिक्षण व आरोग्य सभापती डाँ. अनिशा दळवी,महिला बालकल्याण सभापती शर्वणी गावकर भाजपा तालुकाध्यक्ष सावंतवाडी महेश धुरी,आरोंदा हायस्कूल आरोंदा उपाध्यक्ष बबन नाईक, सचिव वासुदेव उर्फ भाई देउलकर ,तसेच प्रशालयेचे मुख्याध्यापक तांबे सर,गोसावी सर,आरोंदेकर ,कोरगावकर इतर पालकवर्ग विद्यार्थी आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला.
आरोंदा हायस्कूल आरोंदा या प्रशालयेच्या गरजू होतकरू गरीब दहा मुलींना सायकल मिळाल्याने खासदार सुरेश प्रभू यांंचे प्रशालयेचे मुख्याध्यापक सिद्धार्थ तांबे यांनी आभार व्याक्त केले.

अभिप्राय द्या..