शेतकरी हाच संस्थेच्या विकासाचा पाया : आडेली सोसायटी चेअरमन समीर कुडाळकर.

वेंगुर्ले /-

वेंगुर्ले तालुक्यातील आडेली येथील श्री देव सोमेश्वर सहकारी विकास संस्थेकडून दुध उत्पादक ६३ शेतकऱ्यांना सन २०२०- २१ या आर्थिक वर्षाकरिता भेटवस्तू व बोनसचे वाटप करण्यात आले. या वेळी प्रत्येक दुध उत्पादक शेतकऱ्याला किटली, बकेट व बोनसचे वाटप चेअरमन समिर कुडाळकर व संचालक राजेश सामंत, गुणाजी म्हारव, शांताराम धर्णे यांच्या हस्ते करण्यात आले. सोमेश्वर विकास संस्थेने २०१७ साली दुध संकलन केंद्र सुरू केले. या चार वर्षांच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या चांगल्या प्रतिसादामुळे दुध संकलन मोठ्या प्रमाणावर होत असून चांगला नफा संस्थेला होत आहे. या प्रगतीस शेतकऱ्यांचे योगदान व सहकार्य मोठे असल्याचे तसेच गेल्या पाच वर्षांत संस्थेने सहकारात तालुक्यात उल्लेखनीय कामगिरी करुन सहकार क्षेत्र वृद्धिंगत केले असल्याचे संस्थेचे चेअरमन समिर कुडाळकर यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांना दुध उत्पादना विषयी अडचणी व समस्या यावर मार्ग काढण्यासाठी गोकूळ दुध संघाच्या माध्यमातून मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. शेतकऱ्यांनी संस्थेच्या होत असलेल्या प्रगतीवर समाधान व्यक्त केले. तसेच दुध संकलन केंद्र कर्मचारी सुहास कांबळी यांचे चांगल्या कामासाठी अभिनंदन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक राजेश सामंत, गुणाजी म्हारव, शांताराम धर्णे, सचिव बाळकृष्ण गोगटे, कर्मचारी सुहास कांबळी, मोरेश्वर कांबळी, प्रमोद धर्णे, संतोष परब, शेतकरी अरुण धर्णे, अशोक गावडे, नाना गावडे, रामचंद्र धर्णे, तात्या कोंडसकर, राजाराम धर्णे, दयानंद धर्णे, उत्तम आगलावे, चंद्रकांत धर्णे, दिनेश बिडये, महेश धुरी, ताता धर्णे, दामोदर धुरी, परशुराम धर्णे, गणपत कुबल,रामचंद्र आडेलकर, एकनाथ मोहिते,बाळा सोनसुरकर आदी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सचिव गोगटे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page