आचरा /
सोमवारी दुपारी मुसळधार पावसासह आलेल्या सोसाट्याच्या वारयामुळे आचरा डोंगरे वाडी येथील पालकर यांचे चिंचेचे झाड विद्युत तारांसह लगतच्या भातशेतीत पडून नुकसान झाले.यात तीन पोल मोडून पडल्याने डोंगरेवाडी भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
सतत कोसळणाऱ्या पावसाने या भागातील भातशेती ला धोका निर्माण झाला आहे. यातच रविवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने थोडी उसंत घेत पुन्हा सोमवारी सकाळपासून जोरदार सुरुवात केल्याने रस्त्यावर पाणी साचले होते.आचरा डोंगरे वाडी येथील रस्त्यालगत असलेले पालकर यांचे चिंचेचे झाड सोमवारी दुपारी आलेल्या सोसाट्याच्या वारयामुळे उन्मळून लगतच्या विद्युत तारांसह भातशेतीत पडले.त्यामुळे केशव परब यांच्या भातशेतीचे नुकसान होण्याबरोबरच विद्युत तारांवर पडल्याने डोंगरे वाडी येथील तीन विद्युत पोल मोडून पडत विद्युत मंडळाचेही मोठे नुकसान झाले आहे.चिंचेचे भले मोठे झाड रस्त्यावर पडल्याने वाहतूकीलाही अडथळा निर्माण झाला आहे.
.या बाबत माहिती मिळताच आचरा पोलीस पाटील जगन्नाथ जोशी यांनी याची खबर महसूल विभाग आणि विद्युत मंडळाला दिली.