You are currently viewing ओसरगाव एक लाख विस हजारांच्या दारुसह 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त..

ओसरगाव एक लाख विस हजारांच्या दारुसह 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त..

कणकवली /-

मुंबई गोवा महामार्गावर ओसरगाव येथे बोलेरो गाडीतून होणारी गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक एलसीबी च्या पथकाने पकडली. 1 लाख 19,400 रुपयांच्या दारुसह 2 लाख रुपये किंमतीची बलेरो गाडी जप्त करून या गुन्ह्यातील आरोपी गजानन रावजी जाधव (सध्या रा. नाडकर्णी नगर, कलमठ, मूळ रा. त्रिंबक बौद्धवाडी , ता. मालवण) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हवालदार प्रवीण पंढरीनाथ वालावलकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एलसीबी पीएसआय एस.एम.शेळके, हवालदार सी आर पालकर, हवालदार जि बी कोयंडे 25 नोव्हेंबर रोजी रात्री गस्त घालत असताना बलेरो गाडी क्र. MH -07- Q- 1700 ओसरगाव येथे संशयितरित्या उभी असलेली दिसली.बलेरो गाडीत चालक गजानन जाधव होता. बलेरो गाडीची तपासणी केली असता गोवा बनावटीची दारू सापडली.

अभिप्राय द्या..