You are currently viewing युवा फोरम भारत संघटना संस्थापक अध्यक्ष यशवर्धन जयराज राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यक्रम संपन्न.

युवा फोरम भारत संघटना संस्थापक अध्यक्ष यशवर्धन जयराज राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यक्रम संपन्न.

कुडाळ /-


26 नोव्हेंबर रोजी असलेल्या युवा फोरम भारत संघटना संस्थापक अध्यक्ष यशवर्धन जयराज राणे यांच्या वाढदिवसानिमित्त 20 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक २५/११/२०२१ रोजी ठीक ३ वाजता बॅरिस्टर नाथ पै विद्यालय येथे कायद्याविषयक मार्गदर्शन सत्र आयोजित केले होते,कुडाळचे प्रख्यात वकील ऍड. अजित भणगे, तसेच कुडाळ न्यायालयच्या सरकारी वकील ऍड. पूनम राऊळ या उपस्थित होत्या,ऍड. अजित भणगे व ऍड. पूनम राऊळ यांनी खूप खेळीमेळीच्या वातावरणात छान प्रकारे विद्यार्थ्यांना कायद्याविषयी माहिती दिली तसेच ऍड. अजित भणगे यांची वकिली क्षेत्रात चाळीस वर्षे प्रॅक्‍टिस केल्याबद्दल तसेच समाज सेवेतील योगदानाबद्दल युवा फोरम मार्फत त्यांचा सत्कारही करण्यात आला.कार्यक्रमास शाळेच्या विद्यार्थ्यांचे तसेच शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांचे खूप छान प्रकारे सहकार्य होते
यावेळी या कार्यक्रमास युवा फोरम भारत संघटना संस्थापक अध्यक्ष यशवर्धन राणे, सचिव एड.हितेश कुडाळकर, केतन शिरोडकर शुभम सिंदगीकर विवेक राजमाने रोहन करमाळकर विनोद निकम हे उपस्थित होते तसेच या कार्यक्रमास बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सातपुते सर व केंद्रप्रमुख श्री उदय शिरोडकर यांनी खूप सहकार्य केले.

अभिप्राय द्या..