You are currently viewing आंबोली येथील “डार्क फॉरेस्ट” हॉटेलवर सिंधुदुर्ग पोलिसांची धाड.;आंध्र प्रदेशातील ३४ जणांना घेतले ताब्यात.

आंबोली येथील “डार्क फॉरेस्ट” हॉटेलवर सिंधुदुर्ग पोलिसांची धाड.;आंध्र प्रदेशातील ३४ जणांना घेतले ताब्यात.

सावंतवाडी /-

आंबोली- चौकुळ येथिल डार्क फॉरेस्ट रिट्रीट या हॉटेलवर सिंधुदूर्ग व सावंतवाडी पोलिसांनी संयुक्तरित्या धाड टाकून तब्बल आंध्र प्रदेशातील ३४ जणांना ताब्यात घेतले. तर त्यांच्याकडू एकून ४७ हजार ७५८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याबाबतची तक्रार हवालदार जगदीश दुधवडकर यांनी दिली.

परवाना नसताना मद्य पिणे, अश्लिल हावभाव करणे, धिंगाणा घालणे आणि कोविड नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी हॉटेल मालकासह वेटर व संबधितांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहीती सावंतवाडी पोलिस ठाण्याचे निरिक्षक शंकर कोरे यांनी दिली.दरम्यान अशाप्रकारे सावंतवाडीत झालेली ही पहीलीच कारवाई असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

याबाबत अधिक माहीती अशी की, आंबोली चौकुळ रस्त्यावर जंगल परिसरात असलेल्या हॉटेल डार्क फॉरेष्ट मध्ये परप्रांतीय युवती आणून धिंगाणा घातला जात असल्याची टिप अज्ञाताकडुन थेट सिंधुदूर्ग पोलिस अधिक्षकांना देण्यात आली होती. त्यानुसार सिंधुदूर्ग पोलिसांनी धाड टाकण्यासाठी सापळा रचला. यावेळी उपविभागीय पोलिस अधिक्षका नितीन कटेकर यांनी बांदा येथून कुंभवडे मार्गे त्या ठीकाणी जावून त्या ठीकाणी धाड घातली. यावेळी त्या ठीकाणी १८ पुरूष आणि दहा युवतींना ताब्यात घेतले आहे .तसेच दहा बाटल्या दारू आणि त्या ठीकाणी वापरण्यात आलेले साहीत्य जप्त करण्यात आले आहे.

याबाबतची माहीती श्री कोरे यांनी दिली. उपविभागीय अधिकारी कटेकर यांनी ही कारवाई केली. त्यानंंतर आम्हाला बोलावून घेतले. त्या ठीकाणी तब्बल ३४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. संबधित संशयित हे आंध्रप्रदेश मधील एका कंपनीतील आहेत. ते या ठीकाणी पार्टी करण्यासाठी आले होते. धाड टाकली तेव्हा ते मध्यधुुंद अवस्थेत तसेच अश्लील हावभाव करताना आढळून आले. या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे तात्काळ न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करुन त्या ठीकाणी त्यांना हजर करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..